Wed, Jul 24, 2019 14:37होमपेज › Belgaon › शिक्षकांच्या दहा हजार जागा पदवीधरांसाठीच

शिक्षकांच्या दहा हजार जागा पदवीधरांसाठीच

Published On: Jun 20 2018 1:13AM | Last Updated: Jun 19 2018 9:00PMबेळगाव : प्रतिनिधी

दोन वर्षांपासून शिक्षक भरती रखडलेली  आहे. त्यामुळे हजारो डीएड, बीएडधारक बेरोजगार आहेत. शिक्षण खात्याने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) माध्यमातून शिक्षकांची निवड केली जात आहे. आता राज्यातील प्राथमिक  शाळेतील दहा हजार पदवीधर शिक्षकांच्या जागा लवकरच भरणार आहे. तथापि केवळ सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक वर्गांसाठीच भरती केली जाणार आहे. त्यामुळे पदवीधारकांना संधी मिळेल, पण डीएडधारकांना संधी मिळणार नाही.

सीईटी निकाल वर्षभरापूर्वी जाहीर झाला. त्यामध्ये अधिक गुण घेतलेल्या पदवीधारकांची मेरीटनुसार निवड होणार आहे. सरकारने पाच वर्षापूर्वी टीईटी सुरू केली. त्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 150 पैकी 90 गुण अत्यावश्यक केले. त्यामुळे अनेक पदवीधरांनाही ती परीक्षा पार करणे कठीण बनले आहे. टीईटीनंतर पुन्हा सीईटी घेतली जातेे.  शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हे दोन टप्पे करण्यात आल्याचे शिक्षण खात्याचे म्हणणे आहे. 

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवी वर्गासाठी डीएडधारकांची नियुक्ती केली जात आहे, तर सहावी ते आठवीसाठी पदवीधरांची (बीए, बीएस्सी) नियुक्ती केले जात आहेत. पण, शिक्षक भरती रखडल्याने अनेक डीएडधारक रोजगाराविना आहेत. सीईटी उत्तीर्ण होऊनही त्या पात्र डीएडधारकांना पुन्हा प्रतिक्षाच करावी लागणार आहे.  

शिक्षण खातेे पहिल्या टप्यात आठ हजार जागा भरणार आहेत.  त्यासाठी सरकारकडे प्रस्ताव ठेवणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी पुन्हा दोन हजार जागा भरणार आहे. त्यामुळे शाळांतील शिक्षक समस्या कमी होईल. दरम्यान, तोपर्यंत शिक्षकांची अडचण होऊ नये, यासाठी अतिथी शिक्षकांची शाळेत निवड केली जात आहे.