Tue, Mar 26, 2019 07:40होमपेज › Belgaon ›  बेळगाव दंगलप्रकरणी दहा जणांना अटक 

 बेळगाव दंगलप्रकरणी दहा जणांना अटक 

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 12:52AMबेळगाव : प्रतिनिधी 

मंगळवारी शहरामध्ये समाजकंटकांकडून झालेल्या दगडफेकीत मोठी हानी झाली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धक्का बसला आहे. दंगल नियंत्रणात आणण्यास मार्केट पोलिस निरीक्षक प्रशांत यांना अपयश आल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त एम. चंद्रशेखर यांनी बुधवारी सदर आदेश जारी केला. 

मंगळवारी निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे अनिल बेनके यांची विजयोत्सव मिरवणूक काढण्यात आली. फोर्ट रोड येथे आलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे या भागात झालेल्या दगडफेकीत नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले. काही जण जखमीही झाले आहेत. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मार्केट पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्‍या या भागात कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचला आहे. दंगल नियंत्रण ठेवण्यास पोलिसांना अपयश आल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.  त्यांच्या निलंबनामुळे रिक्त पदाची सूत्रे खडेबाजार सीपीआय यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.