Fri, Jul 19, 2019 20:49होमपेज › Belgaon › अपघातात टेम्पोचालक ठार

अपघातात टेम्पोचालक ठार

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:15PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

तीस नंबर बिडी कारखान्याजवळ मुंबईहून बेळगावकडे निघालेल्या भरधाव मालवाहतूक आयशर टेम्पोने थांबलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. यामध्ये टेम्पोचालक मन्सूर हुसेन (30, मूळ गाव रा. तहसील सुरानकोटे, जि. पुंछ, सध्या  रा. बंगारपेठ, जि. कोलार) हा ठार झाला. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली आहे.

मुंबईहून हुबळीकडे निघालेल्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने चालक शब्बीर शेख (रा.अंकोला) हा दुरुस्ती करत होता. मागून येणार्‍या आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने थांबलेल्या ट्रकला धडक दिली. यात चालक मन्सूर हा गंभीर जखमी झाला.

त्याला उपचारसाठी म. गांधी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी शहर स्थानकाचे सहायक फौजदार एम. जी. निलाखे, हवालदार एस. एस. हिरेमठ यांनी पंचनामा केला.