Mon, Jul 22, 2019 00:36होमपेज › Belgaon › टेंपो पलटी;25 जखमी

टेंपो पलटी;25 जखमी

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:54PMबेळगाव : प्रतिनिधी

लग्नानंतरची सत्यनारायण पूजा आटोपून परतणार्‍या कणबर्गीच्या वर्‍हाडी मंडळींचा टेंपो पलटी होऊन 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी बेकिनकेरेजवळ हा अपघात घडला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लहान मुलांचाही जखमींमध्ये समावेश होता.

कणबर्गी येथील वर्‍हाडी हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथे सत्यनारायण पूजेसाठी गेले होते. पूजाकार्य संपवून बेळगावकडे परत येतना बेकिनकेरे गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला.

यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहे. चालकाचाही समावेश आहे. बहुतांशी जखमी कणबर्गीचे रहिवाशी आहेत. जखमींची नावे अशी : सुशीला शिवाजी दड्डीकर (55), वीणा मुचंडीकर (35), रामाक्‍का रवळनाथ मुचंडीकर (35), वंदना शिवाजी बनोशी (45), तेजू गंगाराम मालाई (21), यल्‍लू मनोहर सुंठकर (60), सुगंधा धर्मोजी (60), छाया विलास पाटील (40), ज्योती तानाजी सुळगे-पाटील (16), सुनिता मालाई (39), प्रेमा सुंठकर (60), राजू सुंठकर (44), विद्या प्रकाश मोदगेकर (19), रेखा कंग्राळकर (35), मल्‍लव्वा बिळगोजी (55), लक्ष्मी सिद्राय बिळगोजी (55), सुधा मुंगूटकर (43), लक्ष्मी सुंठकर (35), दिपा पाटील (40), गौरा लक्ष्मण मुचंडीकर (55), मंदिरा महादेव पाटील (35), पूजा संदीप सुंठकर (23), लक्ष्मी पाटील (35), रेणुका अष्टेकर (25). 

काही जणांच्या डोक्याला, तर काही जणांच्या चेहर्‍याला मार लागला आहे. टेंपो पलटी झाल्यानंतर एकमेकांच्या अंगावर पडूनही काही  जण जखमी झाले. रात्रीपर्यंत काकती पोलिसांत नोंदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. जखमींना बेळगावला आणले गेल्यानंतर प्राथमिक चौकशी करून रात्री 10च्या सुमारास पोलिस घटनास्थळी दाखल झाले.