Mon, May 27, 2019 01:19होमपेज › Belgaon › ‘सांगा आमच्या जनावरांनी जगायचं कसं?’

‘सांगा आमच्या जनावरांनी जगायचं कसं?’

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:11AMबेळगाव : प्रतिनिधी

‘गायरान वादामुळं सांगा आमच्या जनावरांनी जगायचं कसं, ’ असा आर्त सवाल बिजगर्णींच्या ग्रामस्थांनी केला आहे. गायरानावर अतिक्रमण झाल्याने चारा मिळत नाही. मग तो आणायचा कोठून, जनावरांना द्यायचं काय, असा प्रश्न त्यांनी केला.गावकर्‍यांनी अतिक्रमण हटवा, गायरान वाचवा, असा न्यारा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि.2 रोजी मोर्चा काढला.

चौदा वषार्ंपासून बिजगर्णी गायरानाचा वाद धुमसत आहे. सर्व्हे क्र. 202, 203, 204, 210, 211, 213, 216, व 217 मधील 72 एकर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात  आला. गावकर्‍यांच्या बाजूने निकालदेखील लागला. तरीही अतिक्रमण हटले नाही. अतिक्रमण हटविण्यासाठी गावकर्‍यांनी पुढाकार घेतला असता त्यांच्यावरच अतिक्रमण करणार्‍यांनी खटले दाखले केले आहेत. प्रकरण लाठीमारावर आले. यामुळे ते चिघळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर याची जबाबदारी प्रशासनावर राहिल. यामुळे गायरान प्रश्‍नी लवकर न्याय मिळाला पाहिजे. जिल्हाधिकार्‍यांनी यात हस्तक्षेप घालून बिजगर्णीला त्यांची हक्‍काची गायरान जमीन मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.मोर्चाला जमलेल्या नागरिकांच्या ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने जाणून घेतल्या.