Tue, Nov 13, 2018 03:47होमपेज › Belgaon › शिक्षकांची बदली प्रक्रिया उद्यापासून सुरू

शिक्षकांची बदली प्रक्रिया उद्यापासून सुरू

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:28AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा  निवडणुकीमुळे रखडलेली शिक्षक बदली प्रक्रिया सोमवार, 18 जूनपासून सुरू होणार आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयात काऊन्सिलिंगद्वारे बदली प्रक्रिया राबवली जाईल. 

दोन वर्षांपासून शिक्षकांची बदली रखडली आहे. त्यामुळे  बदलीच्या प्रतीक्षेत असणार्‍या शिक्षकांना एकाच ठिकाणी सेवा बजावावी लागत आहे. बदलीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज भरण्याची मुदत तीनवेळा वाढवून देण्यात आली. 

यंदा शिक्षण बदली नियमावलीत बदल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात एकाच ठिकाणी दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांची शहरात बदली होणार आहे. शहरातील शिक्षकांची ग्रामीण भागात बदली केली जाईल.  

गट शिक्षणाधिकारी कार्यालयात रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. सदर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागणार आहे. ज्येष्ठतेनुसार बदली प्रक्रिया होणार आहे.