होमपेज › Belgaon › कर्नाटकात दहा वर्षे शिक्षण घेण्याची अट रद्द

कर्नाटकात दहा वर्षे शिक्षण घेण्याची अट रद्द

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 06 2018 12:12AMनवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी

कर्नाटकात वैद्यकीय व दंत वैद्यकीय पदव्युत्तर (पीजी) शिक्षणासाठी सरकारी कोट्यातून प्रवेश मिळविण्यासाठी राज्यात 10 वर्षे शिक्षण घेतलेले असावे, अशी राज्य सरकारची अधिसूचना सर्वोच्च न्यायायलाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे पात्र सर्व विद्यार्थ्यांना सरकारी कोट्यातून प्रवेश मिळू शकतो.

वैद्यकीय शिक्षण संचालनालय व कर्नाटक परीक्षा प्राधिकारणाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करून नव्याने परीक्षा वेळापत्रक जारी करावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा व न्या.यू. यू. ललित यांच्या संयुक्‍त खंडपीठाने दिला आहे.

कर्नाटकात 10 वर्षे शिक्षण घेतलेले तसेच मूळ कर्नाटकातील विद्यार्थीच सरकारी व खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या  सरकारी कोट्यातून प्रवेश घेण्यास पात्र असतील, असे कर्नाटक सरकारने आपल्या अधिसूचनेत  म्हटले होते. त्याला आक्षेप घेऊन काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने ‘कर्नाटकात किमान 10 वर्षे शिक्षण’ ही अट  रद्द  केली. 

Tags : Karnataka, Taking ten year, education, terms Cancellation,