Tue, Jun 18, 2019 19:25होमपेज › Belgaon › वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाय करा

वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाय करा

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMखानापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील शेतकर्‍यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. मागील एक महिन्यात अस्वलाच्या हल्यात एका शेतकर्‍याचा बळी गेला आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वनविभाग तुटपुंजी भरपाई देऊन हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. वन्यप्राण्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणारे उपाय हाती घेण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी खानापूर वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की ः जंगल भागातील शेतकर्‍यांना जीव मुठीत घेऊन शेती करावी लागत आहे. कौंदल येथील गणपत आण्णू पाटील या शेतकर्‍याचा अस्वलाच्या हल्यात बळी गेला. तर गेल्या आठवड्यात कणकुंबीतील लक्ष्मण बोडगे या तरुणाला अस्वलाच्या हल्यात गंभीर दुखापत झाली. 21 जुलै रोजी माडीगुंजीजवळ शेताकडे चाललेल्या महिलेवर अस्वलाने जीवघेणा हल्ला केला. शेतकर्‍यांच्या जीवाला काडीचे मोल नसल्याचे धोरण वनविभागाने अवलंबविल्याचे दिसून येते. त्याकरिता शेतकरी-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी तातडीने उपाय योजना हाती घ्या. 

यावेळी पंडीत ओगले, पंकज कुट्रे, ग्रा. पं अध्यक्ष सुभाष घाडी, गजानन पवार, हरीहर बिर्जे, कल्लापा बिर्जे, राजू घाडी, वसंत बांदोडकर, संदिप शेमले, दिलीप सोनटक्के, किरण तुडवेकर, मंथन घाडी, संतोष कवळेकर, संदेश गुरव, पुंडलिक मुतगेकर आदी उपस्थित होते.