होमपेज › Belgaon › भारताचा बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय

भारताचा बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय

Published On: Dec 12 2017 11:42AM | Last Updated: Dec 12 2017 12:18PM

बुकमार्क करा

बेळगावः प्रतिनिधी

येथील केएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत-बांग्लादेशच्या महिला क्रिकेट अ संघांदरम्यानच्या टी-20 क्रिकेट मालिकेला आज (मंगळवार) सुरुवात झाली. आजच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. 

बांग्लादेशने दिलेले ५९ धावांचे सोपे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर मेघनाने ३० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तिला वनिताने १४ तर डी.पी वैद्यने ११ धावा काढत चांगली साथ दिली. 

तत्पूर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा संघ १६.४ षटकात अवघ्या ५८ धावांत गुंडाळला. बांग्लादेशकडून रूमाना अहमद हिने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. बांग्लादेशच्या ७ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून कर्णधार अनुजा पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन तर पूजा, टी.पी कनवार, डी हेमलता यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत आहे.