Tue, Jul 16, 2019 02:17होमपेज › Belgaon › उद्या शपथविधी; फक्त 22 मंत्र्यांचा

उद्या शपथविधी; फक्त 22 मंत्र्यांचा

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:21AMबंगळूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली 6 जून रोजी होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 22 मंत्र्यांचा सहभाग राहणार आहे. त्यामध्ये 12 मंत्री हे काँग्रेसचे, तर निजदचे 10 मंत्री यांचा समावेश राहणार आहे. मंत्रिमंडळात एकूण 34 मंत्री राहणार असून, उर्वरित 12 मंत्र्यांचा समावेश नंतर होणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काँग्रेसमधून ज्येष्ठ नेत्यांबरोबर कनिष्ठांनीही दिल्लीला जाऊन लाभ मिळविलेला आहे. निजद पक्षामध्ये हायकमांड या नात्याने एच. डी. देवेगौडा यांनी मंत्र्यांच्या यादीला संमती दिलेली आहे. आता काँग्रेसच्या मंत्र्यांची संमती हायकमांडकडून यावयाची आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार हे मंगळवारी नवी दिल्लीला प्रयाण करणार असून, ते राहुल गांधींबरोबर चर्चा करणार आहेत. या तिन्ही नेत्यांबरोबर राहुल गांधी यांनी चर्चा केल्यानंतरच मंत्र्यांची यादी स्पष्ट होणार आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसमधील सर्वच नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.