Thu, Apr 25, 2019 07:53होमपेज › Belgaon › सुरेशकडे बेनामी मालमत्ता १० कोटींची?

सुरेशकडे बेनामी मालमत्ता १० कोटींची?

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 2:43AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

एसीबीने घातलेल्या छाप्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता  सुरेेश भीमनायक याच्याकडे सुमारे 10 कोटी रुपयांची बेहिशेबी  मालमत्ता सापडल्याची माहिती एसीबीकडून मिळाली  आहे. 
उत्पन्‍नापेक्षा अधिक मालमत्ता  सापडल्याने एसीबी अधिकार्‍यांनी सुरेशला सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे.

बेळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जे. रघु, उपनिरीक्षक विश्‍वनाथ कबुरी व त्यांच्या सहकार्‍यांनी बुधवारी सकाळी पहाटे 6 वा. त्यांच्या कित्तूरसह खानापूर व बेळगाव येथील निवासस्थानावर धाडी घातल्या. या धाडीमध्ये त्यांच्याजवळून बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्‍त करण्यात आल्याची माहिती एसीबीने दिली.  1 कोटी 4 लाख 84 हजार 356  कोटी रु.ची मालमत्ता, विविध बँकांमधील 70 लाख रु.रक्कम याशिवाय शेअर्स व अन्यत्र गुंतवणूक करण्यात आलेली 70 लाख 84 लाख 536 रू. कागदपत्रे तसेच विविध प्रकारची माहिती उपलब्ध न झालेली अशी एकूण 10 कोटी रु. ची मालमत्ता जप्‍त करण्यात आली आहे. त्यांच्यावर एसीबीने कारवाई केलेली असल्याने राज्य सरकारकडे या कारवाई माहिती देण्यात आली असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.