होमपेज › Belgaon › साखर कारखान्यांकडे 194 कोटी बाकी

साखर कारखान्यांकडे 194 कोटी बाकी

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 29 2018 8:31PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून बेळगाव जिल्हा ओळखला जातो. मात्र, साखर कारखानदारांच्या मनमानी कारभाराचा उस उत्पादकांना फटका बसला आहे. दहा साखर कारखानदारांकडे अद्याप 194.33 कोटी थकबाकी आहे. यावर चर्चा करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यापैकी 17 साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम घेण्यात आला. 2017-18 या गळीत हंगामात 1,07,43,366.78 मे. टन उसाचे गाळप झाले. त्यातून 1,20,23,141 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. कारखान्याच्या प्रशासनाने उत्पादकांना बिले देण्यास विलंब केला .

6 जूनपर्यंत 17 साखर कारखान्यांकडे 568.98 कोटी इतकी उसाची बाकी शिल्लक होती. यासाठी शेतकरी संघटनांनी सातत्याने प्रयत्न केले. यामुळे 344.46 कोटीची बिले शेतकर्‍यांना अदा केली. कारखाना प्रशासनाकडे  अद्याप 194.33 कोटी  शिल्लक आहेत.बिल अदा करण्याकडे दुर्लक्ष करणार्‍या कारखान्यावर कारवाईचा बडगा उचलण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत.  यासाठी साखर कारखानदारांची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

दहा कारखान्यांचे दुर्लक्ष

जिल्ह्यातील 17 साखर कारखान्याकडे थकबाकी होती. त्यापैकी 7 साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची थकबाकी अदा केली. उर्वरित दहा कारखान्यांकडे बिले थकीत आहेत. जून 6 पर्यंत अथणी शुगर्स कारखान्याकडे 36.28 कोटीपैकी 18.66 कोटी थकीत होते . रेणुका शुगर्स मुनवळ्ळी कारखान्याने 100.03 कोटी पैकी 45.84 कोटी अदा केले आहे. त्यांच्याकडे अद्याप 54.19 कोटी थकबाकी आहे. व्यंकटेश्‍वर पॉवर प्रोजेक्ट बेडकीहाळ कारखान्याने 10.97 कोटीपैकी 5.39  कोटी अदा केले आहे. तर 5.58 कोटी बिल बाकी आहे.  सतीश शुगर्स हुन्सीहाळ पी.जी. कारखान्याने 51.77 कोटीपैकी 28.05 कोटी अदा केले आहेत. तर 23.72 कोटी थकबाकी आहे.घटप्रभा गोकाक कारखान्याकडे 358 कोटी, गोकाक शुगर्स कोळवी 29.98 कोटी, बेळगाव शुगर्स अथणी 4.64 कोटी बाकी आहे. मलप्रभा साखर कारखाना एम. के. हुबळी यांनी   30.38 कोटीपैकी 25.50 कोटी अदा केले आहेत. तर 4.88 कोटी बाकी आहेत. शिरगुप्पी शुगर्स कागवाड कारखान्याने 72.66 कोटी पैकी 67.36 कोटी अदा केेले आहेत. तर 5.30 कोटी बाकी आहे.