Wed, Nov 14, 2018 06:11होमपेज › Belgaon › सुधीरकुमार रेड्डी बेळगावचे नूतन एस.पी.

सुधीरकुमार रेड्डी बेळगावचे नूतन एस.पी.

Published On: Jan 21 2018 2:44AM | Last Updated: Jan 21 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बी. आर. रविकांतेगौडा यांची मंगळूर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख म्हणून बदली करण्यात आली असून, बेळगावचे पोलिसप्रमुख म्हणून मंगळूर पोलिसप्रमुख सी.  एच. सुधीरकुमार रेड्डी यांची नियुक्‍ती केली आहे. सरकारने शनिवारी हा आदेश बजावला. मंगळूरचे जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून सुधीरकुमार रेड्डी यांनी जून 2017 मध्ये अधिकारसूत्रे स्वीकारली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांत मंगळूर जिल्ह्यात हिंसाचार वाढला आहे.

जातीय दंगली व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्येमुळे कर्नाटक सरकारला विरोधी पक्षाच्या टिकेला तोंड द्यावे लागले होते. या कारणासाठीच सरकारने तेथून त्यांची बदली केली असण्याची शक्यता आहे. डॉ. रविकांतेगौडा हे बंगळूर शहरात डीसीपी पदावर असताना त्यांनी तीन कुख्यात गुंडांचा एन्काऊटर केला होता. जातीय दंगली हातळण्यामध्ये ते कुशल पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची मंगळूरसारख्या संवेदनशील जिल्ह्यासाठी नियुक्‍ती झाली आहे.