Sun, May 31, 2020 18:43होमपेज › Belgaon › शोषणमुक्‍तीसाठी विचार हेच हत्यार 

शोषणमुक्‍तीसाठी विचार हेच हत्यार 

Published On: Jan 01 2018 1:54AM | Last Updated: Dec 31 2017 10:50PM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

संमेलनांमुळे सुसंवाद वाढीस लागतो. आपल्याला पटलेल्या विचारांचा जागर करून ते आचरणात आणणे हे संमेलनाच्या आयोजनामागचे मुख्य प्रयोजन आहे. बहुजनांच्या मेंदूला कुलूप ठोकणार्‍या सामाजिक शोषण पद्धतीचा पाडाव करण्यासाठी विचारांना हत्यार केल्याशिवाय पर्याय नाही. साहित्याच्या विविध प्रकारांतून विद्रोही बाणा जपला नाही. तर शोषणातून बहुजनांची कधीही मुक्‍तता होणार नाही, असे विचार विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमाताई परदेशी यांनी व्यक्‍त केले.

माचीगड (ता. खानापूर) येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित 21 व्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कोणतीही भाषा ही अचानक जन्माला येत नाही. समूहजीवन आणि संवादाची गरज म्हणून भाषा उदयास आली.