Tue, Jul 16, 2019 23:54होमपेज › Belgaon › आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीला अटक 

आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीला अटक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

भेंडिगेरी रस्त्यावरील कुकडोळ्ळी फाट्यावरील घरांवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या 9 जणांच्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीला बागेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास अटक केली.

टोळीकडून 93 हजारांचे सोन्याचे दागिने, 17,350 ची रोकड, 7 मोबाईल हँडसेट व 2 लाख रु.किमतीची क्रूझर असा 3 लाख 10 हजार 900 रु.चा मुद्देमाल जप्त केला.

लोखंडी कटावणी, कटरब्लेड, काठी, मिरची पूड आदींचा वापर दरोड्यासाठी करत होते. या वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या. क्रूझरने येऊन महामार्गावरील घरांवर दरोडा घालण्यात येत होता. 
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवाजी ऊर्फ शिवल्या रामू चव्हाण (वय 32, रा. विजापूर), गोविंद संजू काळे ऊर्फ राठोड (19, रा. हडमगाव, जि. सोलापूर), अनिल ऊर्फ सोनू मासाण (20, रा. श्रीराम नगर गणेशवाडी, शिर्डी), भाऊसाहेब दिलीप पिंपळे (28,  रा. शिर्डी) विरुपाक्ष  पाटील (28), अशोक चव्हाण (30), गोपाल संजू काळे  (19, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.
व्हन्नावर येथील घराचा दरवाजा तोडून नागरिकांना धमकावून मंगळसूत्र, सोने, चेन, अंगठी, रोख 25000 हजार, 2 मोबाईल चोरले. 

30 रोजी गिनीगेरी येथे दरोडा घालून 2.50 ग्रॉम सोन्याची कर्णफुले, मोबाईल, रोकड लांबविल्याची कबुली दिली. शहर पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली बागेवाडी पोलिसांनी कारवाई केली.


  •