Fri, Jul 19, 2019 22:04होमपेज › Belgaon › ट्वीटरवर विमानतळाची ‘झेप’ नाहीच

ट्वीटरवर विमानतळाची ‘झेप’ नाहीच

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 10:41PMबेळगाव : प्रतिनिधी

सांबरा विमानतळावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च केला आहे. परंतु समाजमाध्यमावर सांबरा विमानतळ निष्क्रिय झाले असून  यामुळे प्रवाशांची गोची होत आहे. विमानतळाच्या फेसबुक, ट्वीटर खात्याचा वापर बंद आहे. 

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशभर समाजमाध्यमाचा वापर करून संपर्क क्रांती घडविण्यात येत आहे. सांबरा विमानतळाचे ट्वीटर व फेसबुक खाते मात्र बंद अवस्थेत आहे. विमानतळाचा वापर राज्यातील शेकडो प्रवाशासह कोल्हापूर, सांगली व गोव्यातील प्रवाशाकडून दररोज केला जातो. प्रवाशांना विमानतळाकडून मिळणार्‍या सूचनांचा फायदा समाजमाध्यमातून होतो. समाजमाध्यमाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशानी नाराजी व्यक्त केली आहे.

सांबरा विमानतळ या परिसरातील जुने विमानतळ आहे. मागील वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून या विमानतळाचे विस्तारीकरण आणि नूतनीकरण केले आहे. समाजमाध्यमावर दोन वर्षापूर्वी विमानतळाचे फेसबुक व ट्विटर खाते सुरू केले आहे . परंतु त्याचा वापर केला होत नाही. 

नजिकच्या हुबळी विमानतळाकडून समाजमाध्यमाचा प्रभावी वापर केला जातो. यातून व्यवसायवृद्धीला फायदा होतो. समाजमाध्यमांचा सर्व सरकारी कार्यालये समाजमाध्यमावर वापर करण्यात येत आहे. पोलिस, जिल्हा प्रशासन, रेल्वे विभाग, जिल्हा पंचायत समाजमाध्यमाचा वापर करत  आहेत.