Tue, Aug 20, 2019 04:49होमपेज › Belgaon › येळ्ळूरमधील दगडफेकीची आयुक्‍तांकडून झाडाझडती

येळ्ळूरमधील दगडफेकीची आयुक्‍तांकडून झाडाझडती

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 27 2018 12:05AMयेळ्ळूर : प्रतिनिधी

नवहिंद सोसायटीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शनिवारी रात्री येळ्ळूरमध्ये पोवाडा सादर करण्यात आला; पण पोवाडा सुरू असतानाच अज्ञातांनी दगडफेक केल्याने एक जखमी झाला होता. त्या प्रकरणाची सोमवारी पोलिस आयुक्‍तांनी येळ्ळूरला भेट देऊन चौकशी केली. उपायुक्‍त सीमा लाटकरही त्यांच्यासमेवत होत्या.

संयोजकांनी वाद चिघळू नये याची दक्षता घेत दगडफेक प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नवहिंदने आयोजित केलेल्या श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाला काहींनी विरोध चालविल्याची माहिती आधीच मिळायल्यानंतर वादंग निर्माण होण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे  पोलिस आयुक्‍त राजाप्पा, पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांनी ‘नवहिंद’च्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली व रौप्यमहोत्सवादरम्यान निर्माण होत असलेल्या वादंगासंदर्भात त्यांनी पदाधिकार्‍यांना सूचना केल्याचे कळते.