Sat, Nov 17, 2018 18:28होमपेज › Belgaon › कर्नाटक काँग्रेसमुक्त करा

कर्नाटक काँग्रेसमुक्त करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तुमकूर : प्रतिनिधी

राज्यातील काँग्रेस सरकार भ्रष्ट असून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्य काँग्रेसमुक्त करा आणि भाजपला संधी द्या, असे आवाहन भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलेे.

सिद्धगंगा मठाला अमित शहा यांनी सोमवारी भेट देऊन डॉ. शिवकुमार स्वामी यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर आरोपाच्या फैरी झोडल्या.
शहा म्हणाले, काँग्रेस सरकारच्या प्रशासनाला आणि राजवटीला राज्यातील जनता कंटाळली आहे. यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसची गच्छंती निश्‍चित होईल. जनतेकडून भाजपला संधी मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विकासकामांचे कौतुक देशभरातील जनतेकडून होत आहे. राज्यात भाजप सत्तेवर असताना राबविलेली विकासकामे जनतेच्या लक्षात आहेत. त्याच्या जोरावरच आम्ही निवडणुकांना सामोरे जात असून परिवर्तन अटळ आहे, असेही ते म्हणाले. 

राज्यात राजकीय परिवर्तन घडविण्यासाठी दौरा सुरू केला आहे. दौर्‍याची सुरुवात डॉ. शिवकुमार स्वामी यांचा आशीर्वाद घेऊन केला आहे. हे स्थळ पवित्र असून याठिकाणी हजारो विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. येथे अहोरात्र अन्नदान करण्यात येते,  असेही ते म्हणाले. यावेळी भाजप राज्याध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, खा. प्रल्हाद जोशी, जिल्हाध्यक्ष ज्योती गणेशसह स्थानिक नेते उपस्थित होते.
 


  •