Sun, Mar 24, 2019 16:56होमपेज › Belgaon › बेळगावात उपलब्ध होणार ‘स्मार्ट’ पाणी

बेळगावात उपलब्ध होणार ‘स्मार्ट’ पाणी

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 1:29AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात विविध ठिकाणी स्मार्टसिटी योजनेतून शुद्ध पेयजल मशीन बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 5 ठिकाणी मशीन बसविण्यात येणार आहेत. शहरात विविध ठिकाणी काम सुरु असून एकूण 50 ठिकाणी मशीन बसविण्यात येणार आहेत. एका मशीनचा खर्च सुमारे 8 लाख रुपये असून एकूण खर्च सुमारे 4 ते 5 कोटीच्या घरात जाणार आहे. 

स्मार्टसिटी योजनेतून बेळगाव स्मार्ट करण्याचे प्रयत्न सुरु  असून शहरात 50 ठिकाणी पाणी स्वच्छ मिळणार आहे. स्मार्टसिटी लिमिटेडच्यावतीने बेळगाव शहराच्या विविध भागांमध्ये स्मार्ट पाणी मिळणार आहे. यासाठी ठिकठिकाणी क्‍वॉईन टाकून पाणी मिळण्याची मशीन बसवली जाणार आहे. 5 ठिकाणी मशीनचे काम सुरु असून 2 महिन्यात सर्व मशीन बसविण्यात येणार आहेत. आरसीसी इमारत, पाणी साठविण्यासाठी टाकी, पाईपलाईन आदीसाठी 8 लाखांचा खर्च येणार आहे.  

बेळगाव शहरात महाराष्ट्र, गोव्याहून येणार्‍या प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने  या ठिकाणी प्रवाशांची सतत वर्दळ असते. यामुळे बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी बाटलीतील पाणी खरेदी करावे लागणार नाही. पाणी ही सर्वात मोठी गरज आहे, यासाठी शहर स्मार्ट करताना सर्वात पहिल्यांदा शद्ध पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी झाली होती. ही मागणी गंभीरपणे घेऊन अधिकारी वर्ग कामाला लागला आहे. शहरात गोवावेस, धर्मवीर संभाजी चौक आदी ठिकाणी या मशीन बसविण्यात येत आहेत.