होमपेज › Belgaon › ज्वारीला हमीभाव जाहीर करा 

ज्वारीला हमीभाव जाहीर करा 

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 11:17PMबेळगाव :  प्रतिनिधी

ज्वारीला हमीभाव जाहीर करून जिल्ह्यात ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी खा. सुरेेश अंगडी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

खा. अंगडी यांनी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, ज्वारी 500 ते 600 रु.प्रति क्‍विंटल दराने खरेदी करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे. ज्वारी पीक घेण्यासाठी केलेला खर्चही   निघत नाही. 2100 ते 2200 प्रति क्‍विंटल दर जाहीर  करावा. खरेदी केंद्रे सुरू केल्यास मालाचा उठाव होईल.

निवेदन जिल्हाधिकार्‍यांना  सांबरा विमानतळावर सोमवारी देण्यात आले. यावेळी महापौर  बसप्पा चिक्‍कलदिन्नी, आ. संजय पाटील, महानगर भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुणी, नगरसेवक दीपक जमखंडी, मुतालिक उपस्थित होते.

 

Tags : belgaon, belgaon news, Sorghum, Centers,