Thu, Nov 15, 2018 20:40होमपेज › Belgaon › शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी विशेष टोल पास

शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी विशेष टोल पास

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 10:09PMनिपाणी : प्रतिनिधी

दुर्गराज किल्ले रायगडावर  6 जून रोजी शिवराज्याभिषेकदिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे. देशभरातून लाखो शिवभक्‍त कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील शिवभक्‍तांना यमकनमर्डी व कोगनोळी टोल नाक्यावर टोल द्यावा लागू नये म्हणून विशेष पासची  सोय करण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

निपाणीचे नगरसेवक संजय सांगावकर यांच्याकडे कारपास उपलब्ध आहेत. ते शिवभक्‍तांनी घेणेचे आवाहन करण्यात आले आहे.