Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Belgaon › आनंददायी शिक्षणासाठी : जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षक चक्क सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची घरी

चिकोडीत ‘अक्षर गाडी-शिक्षण यात्रा’ लक्षवेधी

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 31 2018 12:27AMचिकोडी : प्रतिनिधी

शिक्षकांनी  सजलेल्या बैलगाडीत चढून घरोघरी जावून  मुलांना शाळेकडे नेण्याचा अक्षर गाडी-शिक्षण यात्रा नांवाचा विशेष उपक्रम मंगळवारी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात लक्षवेधी ठरला.

दोन महिन्यापासून सुट्टीचा आनंद लुटलेल्या मुलांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी रडत येऊ नयेत, तर हसत खेळत यावे असा संदेश देत मुलांना शाळेकडे आणण्यासाठी चिकोडी डीडीपीआय यांनी असा आगळावेगळा उपक्रम राबविला. सजलेल्या बैलगाडीत चढून घरोघरी जावून मुलांना शाळेकडे आणण्याचा बीआरसी व शिक्षकांनीह प्रयत्न लक्ष वेधला.

चिकोडीनजीकच्या बाणंतीकोडी सरकारी प्राथमीक शाळेत अक्षर गाडी शिक्षण यात्रेला चालना देवून डीडीपीआय एम.जी.दासर म्हणाले चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात हा एका अनोखा प्रयोग आहे. मुलांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. 

बाणंतीकोडी शाळेत मागील वर्षी इयता पहिलीत 25 मुलांची संख्या असलेली यंदा 35 वर गेली आहे.  यामध्ये बीआरसी, शिक्षकांची भूमिका महत्वाची असून 327 पटसंख्या असलेली ही शाळा शांतिनिकेतनाप्रमाणे व्हावी असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गटशिक्षणाधिकारी अजित मन्नीकेरी म्हणाले स्पर्धात्मक काळात मुलांचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. शारीरीक, मानसिक, सामाजिक, संस्कृतिक व नैतीक वाढीवर अधिक प्राधान्य द्यावे.

शालेय साहित्य वितरण 

चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व शाळा तोरणाने सजविण्यात आल्या होत्या.  सर्व शाळांमध्ये मुलांना आणण्यासाठी अक्षर गाडी सज्ज ठेवण्यात आली होती. एसडीएमसी पदाधिकार्‍यांनी शाळेत गोड जेवणाचा स्वयंपाक तयार करण्यात आला होता. शाळेच्या प्रारंभोत्सवाच्या निमित्ताने मुलांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके व पोषाख वितरण करण्यात आले. 

गटशिक्षणाधिकारी श्रीपती भट, सिध्दू धुपदाळ, केरुर ग्राम पंचायत अध्यक्षा शांता यड्रावकर, बाबासाहेब केंचन्नवर, हौसक्का मुंडे, टी.बी.बडिगेर, सीआरपी, बीआरपी व ग्रामस्थ उपस्थित होते. जी.एम.कांबळे यांनी स्वागत तर एस.बी.खोत आभार मानले.