Wed, Apr 24, 2019 00:00होमपेज › Belgaon › साऊंड सिस्टीम लावताय, पण परवानगी हवीच!

साऊंड सिस्टीम लावताय, पण परवानगी हवीच!

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:00AMबेळगाव : प्रतिनिधी

आचारसंहिता काळात लग्न समारंभ आयोजित केला असेल तर परवानगीची मुळीच आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे. मात्र हळद व लग्न समारंभात साऊंड सिस्टीम लावणार असाल तर परवानगी घेणे अनिवार्य आहे, अशी माहिती पोलिस स्थानकातून चौकशीला गेलेल्या लग्नसमारंभ आयोजकांना देण्यात येत आहे.

आचारसंहिता लागू झाल्याने  घरघुती कार्यक्रमावरदेखील बंधने आली आहेत. लग्न सोहळ्याचे औचित्य साधून जेवणावळीचे आयोजन होते का,  याकडे निवडणूक अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. लग्न समारंभात साऊंड सिस्टीम लावणार असाल तर, शिवाजीनगरमधील प्रांताधिकारी कार्यालयातून  परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी लग्नपत्रिकेसोबत अर्ज करावयास हवा. सोबत चलनाचा अर्ज भरून या कार्यालयातून मिळाल्यानंतर  रीतसर चलन भरून त्याची माहिती पोलिस स्थानकाला द्यावी लागत आहे.

विशेष म्हणजे लग्न समारंभात राजकीय व्यक्तींनी प्रचार करता कामा नये. तसे आढळून आल्यास आयोजकावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद कायद्यात आहे. यामुळे शहर परिसरातील निवडणूक काळता लग्न समारंभ आयोजन केलेल्यांना पोलिस स्थानक, बँक, एसी कार्यालयाला चकरा माराव्या लागत आहेत.  त्यामुळे आयोजकांना त्रास सहन करावा लागत आहे.


Tags : Sound system looping, should ,allowed, belgaon news