Tue, Jun 18, 2019 19:22होमपेज › Belgaon › भाजीमार्केट व्हावे अत्याधुनिक

भाजीमार्केट व्हावे अत्याधुनिक

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:28AMराज्य सरकारने शेतकर्‍यांना हमीभाव देणे गरजेचे आहे. शेतकरी जगला तर सारा देश जगू शकेल. शेतकर्‍यांना चार पैसे मिळाले तर आमचा व्यवसायही तारू शकेल. राज्यकर्ते फक्‍त निवडणुकीपुरत्याच घोषणा देतात आणि निवडणुका पार पडल्यानंतर त्या घोषणा कधी विरून जातात याचा पत्ताही लागत नाही. प्रत्येक शहरातील बाजारपेठ अत्याधुनिक करणार असे गेल्या 50 वषार्र्ंपासून लोकप्रतिनिधी सांगत आहेत. मात्र, याची कार्यवाही झालीच नाही. सध्या भाजी मार्केटमध्ये वर्षानुवर्षे ठरावीक ठेकेदारांनाच जागा मिळत आहे. त्यामुळे नवीन भाजी विक्रेत्यांना व्यापार करणे मुश्कील झाले आहे. 

भाजी मार्केटला शिस्त नसल्याने शहर, उपनगरात जागा मिळेल त्या ठिकाणी अनेकजण भाजी विक्री करत आहेत. याचा परिणाम वाहतुकीवर होत असून काहींनी अतिक्रमणे केली आहेत. सर्वत्र विखुरलेल्या भाजी विके्रत्यांना एकत्र आणले तर भाजीपाल्याच्या दरावरही नियंत्रण ठेवता येईल. यातून शेतकर्‍यांना योग्य तो उत्पादन खर्च आणि नफा मिळविता येईल. शहरातील भाजी मार्केटचे नियोजन अयोग्य असून तेथे स्वच्छतेची समस्या ओह. नव्या सरकारकडून एवढ्याच माफक अपेक्षा.

- यल्लूू पाटील, 
भाजी विक्रेती, गणेशपूर