Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Belgaon › ‘सीमाप्रश्‍नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रध्दांजली’

‘सीमाप्रश्‍नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रध्दांजली’

Published On: Jan 18 2018 12:10PM | Last Updated: Jan 18 2018 11:59AM

बुकमार्क करा
खानापूर : वार्ताहर

मराठीबहुल भाग महाराष्ट्रात सामील व्हावा, यासाठी जनता लढते आहे. सीमाप्रश्‍नाची सोडवणूक हीच  हुतात्म्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन आ. अरविंद पाटील यांनी केले. खानापुरात तालुका म. ए. समितीच्यावतीने हुतात्मा स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

तालुक्यात समितीची सत्ता आहे, ती हुतात्म्यांच्या आशीर्वादानेच. हे  नेत्यांनी विसरू नये, असे ‘मध्यवर्ती’चे सदस्य मारुती परमेकर म्हणाले. हुतात्म्यांना स्मरुन, सत्याची कास धरत ज्येष्ठ नेत्यांनी चळवळ पुढे नेण्याची गरज आहे, असे जगन्नाथ बिर्जे म्हणाले. 

शिवसेनेच्यावतीने अभिवादन...

तालुका शिवसेनेच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.  मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हुतात्म्यांनी दिलेले बलिदान विसरता कामा नये.  शिवसेनेनेही संयुक्‍त महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे, असे विचार तालुकाध्यक्ष नारायण मयेकर यांनी व्यक्त केले. तालुका उपाध्यक्ष दयानंद चोपडे, विष्णुपंत साखळकर, सुरेश देसाई, डी. एम. गुरव व शिवसैनिक उपस्थित होते.