Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Belgaon › म. गांधींचे विचारच देशाला तारू शकतील

म. गांधींचे विचारच देशाला तारू शकतील

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 19 2018 12:25AMबेळगाव : प्रतिनिधी 

महात्मा गांधी हे कर्तृत्वाने महात्मा झाले. त्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. तरीही ते नेत्यांचे नेते होते. काँग्रेसमुक्‍त भारत निर्मात्यांना अजूनही गांधी समजले नाहीत. म. गांधींचे विचारच देशाला तारू शकतील, असे प्रतिपादन पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्‍तर्षी यांनी केले. 

येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 43 व्या बॅ.नाथ पै.व्याख्यान मालेत डॉ.सप्‍तर्षी यांनी पहिले पुष्प गुंफले. ‘महात्मा गांधी समजून घेताना’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. डॉ. सप्‍तर्षी यांच्याहस्ते सरस्वती प्रतिमा व बॅ.नाथ पै.यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 

यानंतर वाचनालयातर्फे देण्यात येणार्‍या पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी विभागात प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार दै. पुढारी, कोल्हापूरच्या प्रतिनिधी नसीम सनदी यांना डॉ. सप्‍तर्षी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. कन्नड विभागातून  सुनीता देसाई व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रकाश बिळगोजी व केशव आदी यांना प्रदान करण्यात आला. 

कडोली (ता.बेळगाव) येथील रविना वसंत पावले हिला बीए विभागात प्रा. कृ. ब. निकुंम्ब गौरव पारितोषिक प्रदान करण्यात आले. जयलक्ष्मी ईश्‍वर मालाई (कणबर्गी, ता.बेळगाव) हिने मराठी विषयात सुवर्ण पदक प्राप्‍त केल्याबद्दल कै. सुंदराबाई महादेवराव राऊत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

डॉ. सप्‍तर्षी पुढे म्हणाले, म. गांधी हे देशातील सर्वच लढ्याचे नेते होते. लढ्यासाठी प्राणाचा त्याग करणार्‍या या माणसाने जगात शांतीचा संदेश दिला. गांधींचा जन्म झाला नसता तर आज आपण येथे बोलायलाच उभे राहिलो नसतो. म. गांधींनी स्वत:ची कामे स्वत: करून देशातील नेत्यांना स्वावलंबनाचे  धडे दिले. त्यांनी वैयक्‍तिक जीवनात मोठा लोकसंग्रह केला होता. व्यासपीठावर अनंत जांगळे, सुनीता मोहिते, अनंत लाड आदी मान्यवर उपस्थित होते.