Tue, Apr 23, 2019 19:49होमपेज › Belgaon › निपाणीत काँग्रेस-भाजपमध्ये सोशल मीडिया वॉर

निपाणीत काँग्रेस-भाजपमध्ये सोशल मीडिया वॉर

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 9:16PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे विविध आरोप प्रत्यारोप वाढत आहेत. निवडणूकपूर्व प्रचाराला चांगलाच रंग भरत आहे. सोशल मीडियाचा वापर करून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. 

निपाणी मतदारसंघात काँग्रेसने सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर दिला असून  निपाणीच्या विद्यमान आमदार आणि नगराध्यक्षांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे. सध्या स्मार्टफोन मोबाईलमुळे सोशल  मीडिया प्रचाराचे प्रभावी माध्यम बनत चालले आहे.  नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी 9 जानेवारी 2018 रोजी पालिका सभागृहात बोलविलेल्या आश्रय कमिटीच्या बैठकीस आ. शशिकला जोल्ले साडेचार वर्षानंतर उपस्थित राहिल्या. यावेळी नगराध्यक्ष व आ. शशिकला जोल्ले यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ दोन दिवसापासून व्हाटस्अ‍ॅपवर व्हायरल झाला आहे. 

सदर व्हिडिओ निपाणी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर अपलोड झाला असून या व्हिडिओला 24 तासात 10 हजार जणांनी पाहिले आहे.  सध्या व्हिडीओची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरू आहे. या व्हिडीओबाबत आमदारांनी मौन बाळगले असून त्यांच्याकडून याला काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सदर व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.