होमपेज › Belgaon › स्मार्ट रस्त्यांसाठी सर्वात मोठी निविदा

स्मार्ट रस्त्यांसाठी सर्वात मोठी निविदा

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:19PMबेळगाव : प्रतिनिधी      

बेळगावची स्मार्ट सिटीसाठी निवड झाल्यानंतर अनेक कामांना वेग आला आहे. 94.30 कोटी रु. खर्चातून स्मार्ट रस्ते बनविण्यात येणार असून यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. सर्वात मोठ्या रकमेची ही निविदा असल्याचे सांगण्यात येत आहे. धर्मनाथ भवननजीक तीन रस्ते व श्रीनगर आणि अंजनेयनगर येेथे प्रत्येकी एक रस्ता बनविण्यासाठी ही निविदा आहे. हे रस्ते व्हाईट टॉप (पेव्हमेंट क्‍वालिटी काँक्रिट) बनविण्यात येणार आहेत.

धर्मनाथ चौैकानजीक 2.5 कि. मी. लांबीचे तीन रस्ते तसेच श्रीनगर ते अंजनेयनगरपर्यंतचा दोन कि. मी. रस्ता स्मार्ट बनणार आहे. भुयारी गटारी, वीज, टेलिफोनच्या तारा भूमिगत टाकण्यात येणार आहेत.अत्याधुनिक पध्दतीच्या या रस्त्यांच्या बाजूने पदपथ व सायकल ट्रॅकही बनविण्यात येणार आहे. व्हाईट टॉप रस्त्यांचे आयुर्मान 30 वर्षांपर्यंत असेल. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत  अलिकडेच नेहरूनगरातील केपीटीएल रस्ता व मंडोळी रस्ता हे डेमो बनविण्याचे काम सुरू असून या कामासाठी 14 कोटी रु. खर्च करण्यात येणार  आहेत.