Tue, Oct 22, 2019 02:05होमपेज › Belgaon › कत्तलखान्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार : मनेका गांधी

कत्तलखान्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी करणार : मनेका गांधी

Published On: Mar 01 2018 4:58PM | Last Updated: Mar 01 2018 4:58PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावातील कत्तलखाने आणि अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात येणार असे केंद्रिय महिला बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले. आज बेळगाव दौऱ्यावर आल्यानंतर कोल्ड स्टोरेजची पाहणी करताना मनेका गांधींनी पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी कत्तलखान्यांच्या स्वरुपातील कोल्ड स्टोरेजची पाहणी केली. कत्तलखान्यांची आणि कोल्डस्टोरेजची अवस्था पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर त्यांनी कत्तलखाने आणि अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.