Sun, Mar 24, 2019 12:59होमपेज › Belgaon › सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी

सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Jan 31 2018 11:41PMबंगळूर : प्रतिनिधी   

 सिद्धरामय्या सरकारने राज्यातील 5 लाख, 20 हजार सरकारी कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोगानुसार वेतन देण्याची शिफारस  केली आहे. या शिफारसीनुसार कर्मचार्‍यांच्या वेतनात 30 टक्के इतकी वाढ होणार आहे. 

त्याचप्रमाणे या वाढीव वेतनाचा लाभ राज्यातील 5 लाख 73 हजार  पेन्शनधारकांना मिळणार आहे. आयोगाने 75 हजार अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था व  नॉन टिचिंग स्टाफलाही वाढीव वेतन देण्याची शिफारस केली आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 10 508 कोटी रु.चा भार पडणार आहे. 

शिफारसीनुसार किमान सुधारित वेतन 17 हजार रु. व कमाल 1 लाख 50 हजार 600 रु.वेतन मिळेल. या सुधारित वेतनाची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून केली जाणार आहे. 

हा अहवाल अर्थ खात्याचे माजी सचिव व आयोगाचे अध्यक्ष एम. आर. श्रीनिवासमूर्ती यांनी राज्याच्या मुख्य सचिव रत्नप्रभा यांना सादर केला आहे. पेन्शनधारकांना या शिफारशीनुसार किमान 8 हजार 500 रुपये व कमाल 75 हजार 300 रुपयांपर्यंत पेन्शन मिळेल. कौटुंबिक पेन्शन मात्र दरमहा 45 हजार 180 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. वाढीव वेतन व भत्त्यांची शिफारस 1 एप्रिस 2012 रोजी झाली होती.