Mon, Jan 21, 2019 23:24होमपेज › Belgaon › बेळगावात सोळा लाखांचे दागिने हस्तगत

बेळगावात सोळा लाखांचे दागिने हस्तगत

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 12:53AMबेळगाव : प्रतिनिधी

दोघा आंतरराज्य चोरट्यांना बेळगाव सीसीबी पोलिसांनी जेरबंद करून बेळगाव शहर उपनगर तसेच शेजारील जिल्ह्यासह विविध राज्यांमध्ये चोरलेले 16 लाख 120 रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. ही माहिती शहर पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

गांधीनगर येथील महंमद अझरुद्दीन शब्बीर मुल्ला (वय 20) आणि टिपूसुल्ताननगर येथील रफिक इस्ताक अहमद शेख (24) यांना अटक करण्यात आली. त्यांनी बेळगाव शहर, उपनगर तसेच अन्यत्र मिळून 26 ठिकाणी घोरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याजवळून 541 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2133 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. 

या दोघांनी बेळगावसह गोवा, महाराष्ट्र, आंध्र, हुबळी, धारवाड, रामनगर व अन्य जिल्ह्यांमध्ये घरफोड्या केल्या आहेत. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली असली तरी अधिक तपासासाठी  पोलिस कोठडी घेण्यात येणार असल्याचे राजाप्पा यांनी सांगितले. 

 घरफोड्यांची कबुली

या अट्टल चोरट्यांनी   मार्केट पोलिस स्थानक  हद्दीत 2, शहापूर 4, एपीएमसी 5, बेळगाव ग्रामीण 4, माळमारुती 9, कँम्पमध्ये एक आणि काकतीत एक ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.त्यांना अटक करण्या साठी पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी यांच्या नेतृत्वाखाली सीसीबीचे बी. आर. गड्डेकर, सीपीआय जी. एम. कालिमिर्ची, पीएसआय जयश्री, एस. एल. देशनूर, शंकर पाटील, शिवलिंग पाटील, दीपक माळगी, बसवराज बस्तवाड, बी. एस. नाईक आदींनी भाग घेतला.    पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी, गड्डेकर, कालिमिर्ची उपस्थित होते.