Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Belgaon › सहा लाख रुपये, सव्वा किलो सोने जप्त

सहा लाख रुपये, सव्वा किलो सोने जप्त

Published On: Mar 22 2018 1:52AM | Last Updated: Mar 22 2018 1:49AMबेळगाव : प्रतिनिधी

महापालिकेचे सहायक कार्यकारी अभियंता आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचे प्रभारी अभियंता किरण सुब्बाराव भट यांच्या निवासस्थानातून सहा लाख रुपये रोकड, एक किलो 200 ग्रॅम सोने आणि 6 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) मंगळवारी पहाटेपासून छापा टाकून ही कारवाई केली होती. ती बुधवारीही सुरू होती. 

दरम्यान, सुब्बाराव यांच्या विजापूरमधील मालमत्तेचीही मंगळवारी छाननी झाली, अशी माहितीही अधिकार्‍यांनी दिली आहे. एसीबीने मंगळवारी राज्यात एकूण सहा अधिकार्‍यांच्या 24 मालमत्तांवर छापे टाकले होते. त्यात सुब्बाराव यांचा समावेश आहे. त्यांच्या मालमत्तांच्या कागदपत्रांची छाननी अजूनही करण्यात येत आहे. बेळगाव एसीबी विभागाचे पोलिस अधीक्षक अमरनाथ रेड्डुी यांच्या नेतृत्वाखाली हे तपास कार्य सुरू आहे. 

दोन दिवसांत सुब्बाराव यांच्या बेळगाव येथील निवासस्थानातून 6 लाखांची रोकड, 1.2 किलो सोने, 6 किलो चांदी, असा ऐवज उपलब्ध झाला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. सुब्बाराव हे मूळचे शिमोग्याचे असल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यांच्या विजापूर येथील मालमत्तांवरही छापा टाकण्यात आला आहे. इतर भागातून मिळालेल्या तपासातील अहवालानंतरच मालमत्तेसंदर्भातील अधिकृत आकडा स्पष्ट होणार आहे.