Mon, May 27, 2019 00:58होमपेज › Belgaon › क्रेनखाली चिरडून सहा मजूर ठार

क्रेनखाली चिरडून सहा मजूर ठार

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 11:04PMगुलबर्गा : वार्ताहर

सिमेंट कारखान्यात वेल्डिंग काम करीत असताना क्रेन अंगावर पडल्याने सहा मजूर चिरडून ठार झाले. सारे मृत बिहारचे रहिवाशी होते. दुर्घटनेत काही जण जखमीही झाले आहेत.

सेडम तालुक्यातील बेनकनहळ्ळी कोडला येथे नव्यानेच स्थापण्यात आलेल्या कारखान्यात गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी संतप्त कामगारांनी  कारखाना कार्यालयावर व राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. तबरक रेहमान अली  (25), बिपीन सहानी (32), अजय (27), महमद जुबेर (32),सुधाकर सहानी (33), पी टी कांचन (33) हे जागीच ठार झाले. 

अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा पोलिसप्रमुख शशीकुमार आणि जिल्हाधिकारी वेंकटेशकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.श्री सिमेंट कारखाना व परिसरात सुरक्षिततेच्यादृष्टीने पाचशे पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. जखमींना स्थानिक खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले .जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस किरकोळ जखमी झाल्याचे समजते.