Sun, Jun 16, 2019 02:11होमपेज › Belgaon › सिद्धरामय्या होणार युतीचे समन्वयक

सिद्धरामय्या होणार युतीचे समन्वयक

Published On: May 21 2018 1:13AM | Last Updated: May 20 2018 9:07PMबंगळूर : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या  आता युतीचे समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सांगण्यात येत आहे.

गेल्या 40 वर्षात त्यांना 2013 मध्ये मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. दुसर्‍यांदा त्यांचे हे पद हिरावले गेले आहे. कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले नाही. यामुळे सिद्धरामय्या यांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे. 

येडियुराप्पा सरकार पडल्यानंतर राज्यात आता निजद-काँग्रेस यांचे आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. बुधवारी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. उभय पक्षात उत्तम समन्वय साधण्यासाठी समितीची गरज आहे. यासाठी सिद्धरामय्या यांचे नाव समन्वयक म्हणून पुढे येऊ शकते, असे संकेत पक्षातून मिळत आहेत. ‘किमान समान कार्यक्रम’ आखण्यासाठी समन्यवक समितीची गरज आहे. सरकारला विविध आघाड्यांवर सिद्धरामय्या मार्गदर्शन करू शकतात.  

जमीरना मंत्रिपद अशक्य

चामराजपेटचे आमदार बी. झेड. जमीर अहमद खान यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. परंतु ते काँग्रेसचा ‘मुस्लिम चेहरा’ म्हणून कायम राहतील