Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Belgaon › मोदी पक्के खोटारडे; सिध्दरामय्यांची जहरी टीका

मोदी पक्के खोटारडे; सिध्दरामय्यांची जहरी टीका

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 10:27AMचित्रदुर्ग : प्रतिनिधी      

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत तेथील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरू लागला आहे. एका अर्थाने भाजपचे काऊंटडाऊन सुरू झाले असल्याची प्रखर टीका मुख्यमंत्री सिध्दरामय्या यानी केली.

होसदुर्ग येथे विविधविकासकामांचा प्रारंभ करून ते बोलत होते.  आपल्या मतदारसंघात विजय मिळविता येणे शक्य न झालेले मुख्यमंत्री योगी आदित्याथ हे कर्नाटकात येऊन भाजपला मते मिळणारच, भाजप विजयी होणारच असे सांगत आहेत. भाजपवाले ढोंगी आहेत. ख्रिश्चन, मुस्लिमांना बाजुला करून ‘सब का साथ, सब का विकास’ असा प्रचार करीत आहेत. मोदी  हे पक्के खोटारडे असून खोटे बोलणार्‍यांवर जनता केव्हाही विश्वास ठेवणार नाही. राबणार्‍या बैलांना चारा देणे, मजुरी करणार्‍यांना मोबदला देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.तेव्हा जनता आम्हालाच पाठिंबा देणार आहे, असे सिध्दरामय्या म्हणाले.

होसदुर्ग येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने दुपारी आगमन झाले. तेथे पत्रकारांसमोर सिध्दरामय्या म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजप दुर्बल बनला आहे. मात्र पंतप्रधान मोदी कर्नाटकात येऊन हिंदुत्वावर भाषा करीत आहेत. तेेथे हिंदुत्वाची भाषा चालली नाही तर कर्नाटकात कशी चालणार?. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवून केंद्रात सरकार स्थापन करेल.

Tags : belgaon, belgaon news, Chitradurga, Siddaramaiah statement, Karnataka election, Narendra Modi