Mon, Jan 21, 2019 07:35



होमपेज › Belgaon › सिध्दरामय्या शेतकरीविरोधी : योगी आदित्यनाथ 

सिध्दरामय्या शेतकरीविरोधी : योगी आदित्यनाथ 

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 8:51PM



हल्याळ : वार्ताहर 

कर्नाटकात अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांची सिध्दरामय्यांनी दखल घेतलेली नाही. यावरून ते शेतकरीविरोधी आहेत, हे सिध्द होते. असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला.

हल्याळ? जोयडा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील हेगडे यांच्या प्रचारार्थ येथे शुक्रवारी सायंकाळी सभा झाली.  दांडेली येथे  शिवरायांचा पुतळा उभारण्याला विरोध झाला यावरून शिवरायांसाख्या थोर पुरुषाचा  कर्नाटकात आदर होत नाही, हे सिध्द होते. कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर आल्यास थोर पुरुषांचे पुतळे उभारण्यास प्राधान्य देऊ, असे योगी म्हणाले.

नंतर उमेदवार हेगडे यांचे भाषण झाले. त्यांनी आ. व्ही. देशपांडे यांच्या कार्यावर टीका केली. देशपांडे गेली 30 वर्षे या भागाचे नेतृत्व करीत आहेत. इतक्या वर्षांत त्यानी नवा कारखाना या भागात उभारून बेरोजगारांच्या हातांना काम मिळवून दिले नाही, असा आरोप  केला. कार्यक्रमाच्या मंचावर जिल्हा भाजप अध्यक्ष के. जी. नाईक, नेते श्रीपती भट, माजी आ. व्ही. डी. हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.