Thu, Jun 27, 2019 18:20होमपेज › Belgaon › वीरशैव, लिंगायतांत फुटीचा प्रयत्न काँग्रेसला पडेल महागात : राजनाथसिंह

वीरशैव, लिंगायतांत फुटीचा प्रयत्न काँग्रेसला पडेल महागात : राजनाथसिंह

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 8:48PMगुलबर्गा : प्रतिनिधी

सिद्धरामय्या सरकारने राज्यामध्ये  वीरशैव-लिंगायत समाजामध्ये फूट पाडण्याचा राजकीय डाव आखलेला आहे, तो डाव त्यांनाच धोका देणारा असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथील प्रचार दौर्‍यामध्ये सांगितले. 

सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने लिंगायत समाजाला भाषिक अल्पसंख्याकांचा स्वतंत्र दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस केली आहे. ती शिफारस राजकीय प्रेरित असून येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदापासून रोखण्याचा तो प्रमुख प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 

राज्य सरकार राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था ठेवण्यामध्ये अपयशी ठेवले असून वरिष्ठ अधिकार्‍यांनाही सरकारकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. राज्यातील सामान्य माणूस सुरक्षित नाही. किनारपट्टी भागातील भाजप व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली, त्यांकडे सरकारने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. 

राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी मतदारांनी भाजपला मतदान करावे. भाजपतर्फे आम्ही सर्वांना समान न्याय व गुन्हेगारांचा मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.