होमपेज › Belgaon › सिद्धरामय्या सरकार म्हणजे काँग्रेसचे एटीएम : योगी आदित्यनाथ 

सिद्धरामय्या सरकार म्हणजे काँग्रेसचे एटीएम : योगी आदित्यनाथ 

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 12:47AMशिर्शी : प्रतिनिधी

कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार म्हणजे काँग्रेसचे एटीएम असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. 

सिद्धरामय्या सरकार भ्रष्टाचारात बुडाले असून त्यांनी राज्यामध्ये एक प्रकारचा जिहाद चालविला असल्याचा आरोपही योगींनी केला आहे. 

कारवार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा प्रचार करताना ते बोलत होते. राज्यामध्ये काँग्रेस सरकारने कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरले आहे. त्यामुळेच राज्यामध्ये भाजप व संघ परिवारातील  सदस्यांची हत्या करण्यात आली आहे. तरीसुद्धा सिद्धरामय्या सरकारने हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई केलेलीनाही. जात, धर्म याचा उल्लेख करून समाजाची विभागणी करण्याचेच धोरण काँग्रेसने अवलंबीले असल्याचा आरोपही योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

योगी हे भाजपचे स्टार प्रचारक असून गुरुवारपासून त्यांनी कर्नाटकात प्रचार सुरू केला आहे. दक्षिण कर्नाटकातही त्यांच्या सभा होणार आहेत.