Tue, Jul 16, 2019 12:27होमपेज › Belgaon › बदामीत सिध्दरामय्यांविरुध्द येडियुरप्पा?

बदामीत सिध्दरामय्यांविरुध्द येडियुरप्पा?

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:43AMबंगळूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांना चांमुडेश्वरीतून पराभवाची भीती असल्याने बदामीमधून निवडणूक लढविणार असल्याचे जगजाहिर झाले आहे. बदामीसाठी ते अखेरच्या दिवशी म्हणजे दि.24 रोजी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. 

भारतीय   जनता पक्षात मात्र खळबळ माजली असून सिध्दरामय्यांना  तेथूनही पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीति आखली आहे. सिध्दरामय्यांच्या तोडीचा उमेदवार बदामी मतदारसंघातून उभा करण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठांनी चालविला असून सिध्दरामय्यांचा  तुल्यबळ उमेदवार म्हणून येडियुरप्पांना बदामीतून उभे करण्याचे ठरविले आहे.

बदामीतून सिध्दरामय्या व येडियुरप्पांचा अर्ज दाखल झाल्यास साप आणि मुंगुसाचा खेळ ठरणार असल्याचे राजकीय वलयातून बोलले  जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यानी बदामीकडे अधिक लक्ष दिले आहे. येडियुरप्पांनी सिध्दरामय्यांचा पराभव केल्यास उत्तर कर्नाटकातील लिंगायतांच्या मतांचे धृविकरण होईल, अशा शहांसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे.  

बदामी मतदारसंघातील धनगर समुदायाची 48 हजार मते आपल्या विजयाला सहाय्यभूत ठरतील, असा सिध्दरामयांचा  विचार आहे. मात्र 55 हजार मते लिंगायतांची व वाल्मिकी समुदायाची 36 हजार मते आहेत. प्रबळ उमेदवाराला उभे केल्यास आपलेच पारडे जड होईल, असा अंदाज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे.

जंग जंग पछाडा, काँग्रेसच सत्तेवर येणार : सिद्धरामय्या

राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप व निजद या दोन्ही पक्षांनी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी कितीही जंग पछाडला तरी राज्यात काँग्रेसलाच बहुमत मिळून तो सत्तेवर येणार असल्याचा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या व्यक्ती केला आहे. 

निजदने आतापासूनच भाजप-बरोबर संधान साधून निवडणुकीनंतर संयुक्त सरकार स्थापन करण्याचा  कट केला आहे. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी बहुमत मिळवून काँग्रेसच सत्तेवर येणार असल्याचा निर्धार सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.  कुमारस्वामी हे केवळ काँग्रेसलाच लक्ष करून जहरी टीका करण्यामध्ये मग्न झालेले आहेत. भाजपवर मात्र ते टीका करण्यास तयार नाहीत. यावरून त्यांनी भाजपशी संधान बांधल्याचे दिसून येते, असे काँग्रेसचे राष्ट्रीय निमंत्रक प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. 

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections, Siddaramaiah,Yeddyurappa, Badami,