Thu, Aug 22, 2019 15:01होमपेज › Belgaon › शाळाखोलीला शॉर्टसर्किटने आग

शाळाखोलीला शॉर्टसर्किटने आग

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 10:35PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

जत्राट वेस परिसरातील केबीएस नंबर 1 च्या खोलीस शॉर्टसर्किटने आग लागल्याने पुस्तकासह अन्य साहित्य जळाले. उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी वेळीच अग्‍निशमन विभागाला पाचारण केल्याने शाळेचे मोठे नुकसान टळले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास झाली.

नेहमीप्रमाणे शाळेचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्याध्यापिका एफ. डी. वाघमारे या शाळेस कुलूप लावून घरी गेल्या. दरम्यान, शाळेशेजारी राहत असलेले चंदशेखर बड्डे हे आपल्या घरावरील टेरेसवर फिरत असताना शाळेच्या आवारातून धूर येत असल्याचे दिसून आले. बड्डे यांनी  याची कल्पना उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांना दिली.