Tue, Mar 26, 2019 23:55होमपेज › Belgaon ›   शिवरायांच्या जयजयकाराला विरोध, कानडी म्होरक्यावर कारवाई कधी होणार?

  शिवरायांच्या जयजयकाराला विरोध, कानडी म्होरक्यावर कारवाई कधी होणार?

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:09AM

बुकमार्क करा
बेळगावः शिवाजी शिंदे

कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायणगौडाने विजापूर येथील इंडीमध्ये बोलताना ‘शिवाजी महाराज की जय’ असे म्हणण्यास कर्नाटकात बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. त्याला ही अवदसा का सुचावी? उद्या हा नारायण ‘जय श्री राम’ म्हणण्यावरही बंदीची मागणी करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या नारायणाला हिंदूंचा इतिहास समजावून सांगण्याची वेळ आली आहे, अशी टीका मराठी नेत्यांनी केली आहे.                                   गौडाच्या वक्तव्यावर उठताबसता शिवाजी महाराजांच्या नावाचा जप करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना अद्याप गप्प  आहेत. म. ए. समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वगळता अन्य संघटनांनी या वक्तव्याचा निषेधही केलेला नाही. 
‘काशी की कला जाती
मथुरा मसजीद बनती
अगर शिवाजी नही होते
तो सबकी सुन्नत होती’

या तत्कालीन कवि - कलश यांच्या ओळी गौडाला कळवण्याची गरज आहे. कर्नाटकातही शासकीय जयंती छ. शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र अथवा मराठा समाजाचे नेते नव्हे तर ते राष्ट्रपुरुष आहेत. त्यांची जयंती कर्नाटक सरकार सहा वर्षांपासून साजरी करते. बलाढ्य अशा परकीय सत्तांनी  अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारतात ठाण मांडले असताना 16 व्या शतकात त्यांना आव्हान देऊन हिंदवी स्वराज्य शिवरायांनी स्थापन केले. त्यामध्ये बहुजन, दलित, बलुतेदार, अलुतेदार यांना मानाचे स्थान दिले. परधर्मियांनाही आधार दिला. म्हणूनच त्यांचा कारभार आदर्श मानला जातो.अशा राजांवर टीका करणार्‍यांबाबत अद्यापही काही संघटनांनी चुप्पी साधली आहे.  त्याबद्दल  अन्य संघटनांच्या आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.