Tue, Jul 23, 2019 02:23होमपेज › Belgaon › शिवशिल्प दुर्लक्षित, स्थानिक उदासीन

शिवशिल्प दुर्लक्षित, स्थानिक उदासीन

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 12:09AMबेळगाव : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातले पहिले म्हणून ओळखल्या जाणार्‍या धारवाड जिल्ह्यातील शिल्पाकडे दुर्लक्ष झाले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असणारे शिल्प एका मंदिरात धूळ खात पडले आहे. याची दखल कोल्हापूर येथील इतिहासप्रेमींनी घेतली. परंतु, बेळगावसह स्थानिक शिवप्रेमींनी दुर्लक्षच केले आहे. 

कोल्हापूर येथील सह्याद्री इतिहास संशोधन मंडळाला मिळताच त्यांनी शनिवार दि. 10 रोजी यादवाडला धाव घेतली. नंतर पालकमंत्री विनय कुलकर्णी यांना निवेदन दिले. 

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून परतताना त्यांनी गदग संस्थानातील बेळवडी संस्थानावर हल्ला केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर पुढे गेले. महाराजांच्या सैन्याने तेथील सरदाराचा पराभव केला. या सरदारांची पत्नी मल्लम्मा यांनी स्त्री सैन्यासह झुंज दिली. हा पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवून मल्लम्माचा सन्मान केला. जिंकलेला किल्ला मल्लम्मा यांच्या मुलाच्या दूधभाताच्या सोयीसाठी परत केला.

यामुळे भारावलेल्या मल्लम्मा देसाई यांनी हे शिल्प उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंतपणीच उभारलेले हे जगातले पहिले शिल्प म्हणून ओळखले जाते. त्याचे महत्त्व अमूल्य आहे. ते जतन करणे आवश्यक आहे.