Thu, Apr 25, 2019 03:31होमपेज › Belgaon › शिवप्रेमी रायगडाकडे...

शिवप्रेमी रायगडाकडे...

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 10:42PMबेळगाव : प्रतिनिधी

रायगडावर होणार्‍या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बेळगाव येथून शिवप्रेमी मंगळवारी सकाळी रवाना झाले. त्यांच्यासह गोवा, खानापूर येथील कार्यकर्तेही बेळगावात येऊन रायगडाकडे रवाना झाले.

रायगडावर 6 जूनरोजी शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. सोहळ्याला देशभरातील शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. हे औचित्य साधून बेळगाव येथील शिवप्रेमी कार्यकर्ते रायगडाकडे रवाना झाले.धर्मवीर संभाजी चौकात गोवा आणि खानापूर येथून आलेल्या शिवप्रेमींचे उत्साही स्वागत करण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन राजेंद्र मुतकेकर, जयराज हलगेकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. शिवसंत संजय मोरे यांनी भगवा ध्वज दाखविल्यानंतर कार्यकर्ते रायगडाकडे रवाना झाले.

मुतकेकर म्हणाले, राज्याभिषेक सोहळ्यानंतर सर्व शक्तींनी शिवरायांचे मोठेपण मान्य केले. सामान्य माणसामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा पार पडला. हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी या सोहळ्यात शिवप्रेमी सहभागी होतात. गोवा येथील महेश पाटील, भरमा चौगुले, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, रवी पाटील, दत्ता उघाडे, मयूर बसरीकट्टी,राजू सिद्धाणी,  राजू किणेकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.