Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Belgaon › कर्नाटकात शिरहट्टीचा विजेता ठरवतो सरकार !

कर्नाटकात शिरहट्टीचा विजेता ठरवतो सरकार !

Published On: May 13 2018 2:12AM | Last Updated: May 12 2018 11:26PMहुबळी : प्रतिनिधी

गदग जिल्ह्यातील शिरहट्टी मतदार संघातील मतदारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सत्तेवर येणार्‍याच उमेदवाराला निवडून देत असतात.  मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा  असू शकेल. अनेक दशकापासून या मतदारसंघाची ही परंपरा सिद्ध झालेली आहे. 

1972 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्यावेळी काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. जेव्हा जनता दल उमेदवार निवडून आला. त्यावेळी जनता दलाचे सरकार सत्तेवर आले. 2004  मध्ये काँग्रेसच्या  उमेदवाराला निवडून देण्यात आले. त्यावेळी काँग्रेस- जनता दलाचे संयुक्त सरकार सत्तेवर आले. 1983 मध्ये या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजयी झाला. त्या उमेदवाराने रामकृष्ण हेगडे सरकारला आपला पाठिंबा व्यक्त केला 

होता.  यावेळी मात्र कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल, ते सांगता येत नाही. मतदानाला आता एकच दिवस शिल्लक असून सध्या चाललेली ही निवडणूक खूपच वैयक्तिक स्तरावर चाललेली असून समस्यांऐवजी वैयक्तिक स्वभावावर ही निवडणूक जात आहे. हावेरी गदग व धारवाड मतदारसंघामध्ये  काँग्रेस भाजप व निजदमध्ये तिरंगी लढती आहेत. शिरहट्टी मतदारसंघातील मतदार यावेळी कोणत्या पक्षाच्यावतीने कौल देणार, त्याकडे  गदग लक्ष वेधले आहे.