Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Belgaon › आरोग्यभाग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

आरोग्यभाग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 10 2018 11:37PMनिपाणी : प्रतिनिधी

संपत्तीपेक्षा आरोग्य हेच भाग्य असून गरीब आणि श्रीमंतांनांही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. वैद्यकीय सेवेअभावी मृत्यू पावणार्‍या गरिबांची संख्या अधिक आहे. शासनाच्या विविध खात्यांकडून नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपण लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना आरोग्यभाग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आ. शशिकला जोल्ले यांनी दिली.

येथील महात्मा गांधी हॉस्पिटल मध्ये मदर अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थ केअर सेंटरच्या पायाखोदाई कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, माजी आ. सुभाष जोशी, माजी आ. काकासाहेब पाटील यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

आ. जोल्ले म्हणाल्या, हेल्थ सेंटरसाठी केंद्र व राज्य सरकारने 8 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. येथे सर्व सोयीनीयुक्त असे हॉस्पिटल होणार असून कँटीनचे उद्घाटन करण्यात आले आहे. कारदगा, सौंदलगा व बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीही नव्याने बांधण्यात येत आहेत. बाळंतपणात महिला व शिशुमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या हेल्थ सेंटरचा उपयोग होईल. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर  म्हणाले, गेल्या 15 महिन्यांत हेल्थ केअर सेंटरची उभारणी होणार आहे. येथे एक्स रे, स्कॅनिंग व आयसीयूची सोय होणे गरजेचे आहे. जि. पं. सदस्य सिद्धू नराटे यांनी 30 खाटांच्या हॉस्पिटलमुळे निपाणी आणि परिसरातील आई आणि मुलांची सोय होणार असल्याचे सांगितले.

डॉ. सीमा गुंजाळ यांनी स्वागत तर आरोग्याधिकारी ऑफिसर व्ही. व्ही. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक दीपक माने, रवींद्र शिंदे, दत्ता जोत्रे, दिलीप पठाडे, विजय टवळे, धनाजी निर्मळे, राज पठाण, अनिस मुल्ला, डॉ. संतोष घाणगेर, ईश्‍वर पत्तार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  डॉ. गणेश चौगुले यांनी आभार मानले.