Tue, Apr 23, 2019 00:40होमपेज › Belgaon › शरद पवार यांची सभा सीपीएड मैदानावर

शरद पवार यांची सभा सीपीएड मैदानावर

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 17 2018 1:15AMबेळगाव : प्रतिनिधी

माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या नियोजित सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सभेसाठी सीपीएड मैदान उपलब्ध आहे. याबाबतचे अधिकृत परवानगी पत्र शनिवारी मिळणार आहे. रविवारी सकाळी 11 वा. समिती नेत्याकडून मैदानाची पाहणी करण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.

मध्यवर्ती म. ए. समितीने 31 मार्च रोजी शरद पवार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. मात्र, सभेसाठी आवश्यक मैदानाला परवानगी देताना प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत होती. समिती नेत्यांनी सभेसाठी सीपीएड मैदान, ज्योती कॉलेज मैदान व व्हॅक्सीन डेपो मैदानाचे पर्याय सुचवले होते. 

ज्योती कॉलेज मैदान शैक्षणिक संस्थेशी संबधित असल्याने संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली. तर सीपीएड मैदानाबाबत चालढकल करण्यात येत होती. यामुळे समिती नेत्यांना बंगळूरपर्यंत धाव घ्यावी लागली .समितीकडून सभेची तयारी सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी जागृती सभा घेण्यात येत असून एक लाख मराठी बांधव जमविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

समितीकडून गुढीपाडव्यादिनी मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. समिती लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रविवार दि. 19 रोजी सकाळी 11 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.