होमपेज › Belgaon › मंडोळीसह आंबेवाडी, कंग्राळी होणार ‘स्मार्ट’

मंडोळीसह आंबेवाडी, कंग्राळी होणार ‘स्मार्ट’

Published On: May 31 2018 1:35AM | Last Updated: May 30 2018 8:43PMबेळगाव : प्रतिनिधी  

ग्रामीण विकास व पंचायतराज खाते तसेच केंद्र सरकार पुरस्कृत शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय मिशन (एसपीएमआरएम) योजना राज्यासाठी मंजूर झाली आहे. पहिल्या टप्प्यात कंग्राळी खुर्द (ता.बेळगाव) तसेच मंडोळी आणि आंबेवाडी गावांची निवड झाली आहे. तशी माहिती जि.पंचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी विभागातील कंग्राळी बुद्रुक, मंडोळी, आंबेवाडी ग्रा.पं.मार्फत योजना राबविण्यात असून  11 कोटी, 6 लाख, 91 हजार रु.च्या कृती आराखड्याला मंजुरी मिळाली असल्याचे रामचंद्रन यानी सांगितले. जि.पं.कार्यालय सभागृहात मंगळवारी एसपीएमआरएम योजना विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून रामचंद्रन बोलत होते.

एसपीएमआरएम योजनेंंतर्गत शहरी भागातील सर्व सोयीसुविधा ग्रामीण भागाला उपलब्ध करून देऊन ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचाविणे हा सरकारचा उद्देश आहे.  राज्यात पहिल्या टप्प्यात बेळगाव, बळ्ळारी व बंगळूर ग्रामीण या तीन  जिल्ह्यांचा  एसपीएमआरएम योजनेत समावेश आहे. 

जि.पं.चे योजना संचालक,कृषी,बागायत, उद्योग, व्यापार,पाणीपुरवठा विभाग,पंचायतराज इंजिनिअरिंग विभाग, आरोग्य? कुटुंबकल्याण, सार्वजनिक शिक्षण खाते, ता.पं. तसेच ग्रा.पं.विकास अधिकारी बैठकीला उपस्थित होते.