Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Belgaon › शहरातील उद्यानांत सातनंतर प्रवेशबंदी

शहरातील उद्यानांत सातनंतर प्रवेशबंदी

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 11:17PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी शहरातील उद्यानांमध्ये सायंकाळी  7 नंतर प्रवेशबंदी लागू केली आहे. शिवाय, जुन्या इमारतींवर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्‍त डॉ. डी. सी. राजप्पा यांनी दिली.

पोलिस आयुक्‍तालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपायुक्‍त सीमा लाटकर, महानंद नंदगावी उपस्थित होते. राजप्पा म्हणाले, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री आणि त्याचे सेवन करण्यात येत असल्याची माहिती प्रसार माध्यमातून  प्रसिद्ध करण्यात येत आहे. पोलिस खात्याने यावर अधिक लक्ष केेंद्रित केले आहे. तथापि, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अमली पदार्थ विक्रीची नोंद कमी आहे. आतापर्यंत पोलिस आयुक्‍तांच्या व्याप्तीमध्ये रशियन ड्रग्ज या संदर्भातील एकही प्रकरणाची नोंद झाले नाही. याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यास पोलिस कारवाई करतील. 

शहरातील उद्यानांमध्ये सायंकाळी 7 नंतर अंमली पदार्थांचे सेवन तसेच विक्री केली जात असल्याची तक्रार आहे. यावरुन गुरुवार 9 ऑगस्टपासूनच सायंकाळी 7  नंतर सकाळी 7 वाजेपयर्ंत प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यानांत या काळात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. समाजकंटकांकडून उद्यानाची नासधूस करण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे  राजाप्पा यांनी सांगितले.