होमपेज › Belgaon › मंगळुरात समुद्रपाणी शुध्दीकरण केंद्र उभारणार 

मंगळुरात समुद्रपाणी शुध्दीकरण केंद्र उभारणार 

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 10:59PMबंगळूर : प्रतिनिधी

मंगळूर येथे समुद्राच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे पाणी शुध्दीकरण केंद्र स्थापन करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्विक मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीनंतर कायदा?संसदीय व्यवहारमंत्री टी.बी.जयचंद्र यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

मंगळूर येथील नियोजित पाणी शुध्दीकरण केंद्राची योजना एकूण806 कोटी रु.खर्चाची असून या खर्चाला मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. आता योजनेचा पक्का आराखडा तयार करणे बाकी असून त्यानंतर पुढील कार्यवाही  हाती घेण्यात येईल, असे ते म्हणाले. मंगळूरहून बंगळुरला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनेबाबत यापूर्वीची चर्चा झाली होती, असेही ते म्हणाले.

21 संस्थांना 203 एकर जमीन 

विधानसभा निवडणूकजवळ आल्याने विविध समुदायांच्या संघसंस्थाना भूखंडांचे मोठ्याप्रमाणात वाटप करून त्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी राज्य सरकार धडपड करीत आहे. 
मंत्रिमंडळ बैठकीत विविध 21  संघसंस्थांना एकूण 203 एकर भूखंड देण्याचा निर्णय झाला आहे. म्हैसूर प्रदेश बलिज संघ, तोटगवीर क्षत्रिय महासंघ, राजू क्षत्रिय संघ, हंदिजोगी संघ, पिळ्ळीकार संघ, मलबार मुस्लिम असोशिएशन, चौडेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट यासारख्या एकूण 21 संघसंस्था भूखंड देण्याचे ठरले आहे.सामाजिक, शैक्षणिक इमारतीसाठी भूखंडांचा वापर करण्याची सूचना संबंधित संघसंस्थांना करण्यात येणार आहे. 

बैठकीतील इतर निर्णय 

मुधोळातील जे.के.सिमेन्ट कंपनीला 485 एकर जमीन खरेदीसाठी व रिनिव स्टार वीज कंपनीला हगरीबोम्मनहळ्ळी येथे 245 एकर जमीन खरेदी करण्यासाठी संमती, हुबळी? धारवाड जीआरटीएस योजना पूर्णत्वास नेण्यासाठी अतिरिक्‍त123 कोटी रु.देण्याला संमती आदी.

 

Tags : Mangalore, Mangalore news,  sea wate, purification center,