Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Belgaon › काँग्रेसकडून सेवा दलाला नवसंजीवनी

काँग्रेसकडून सेवा दलाला नवसंजीवनी

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:40PMबेळगाव : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभुमिवर राजकीय पक्षांनी आता पासूनच कंबरकसली आहे. भाजप प्रमाणे संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडुन प्रयत्न सुरु झाले आहेत. विस्मृतीत गेलेल्या काँग्रेस सेवा दलाला नवसंजीवनी देण्याची तयारी सुरु झाली आहे. सेवा दलाचे संस्थापक ना.सु. हर्डिकर यांच्या  समाधीस्थळा शेजारी कोणताच गाजावाजा नकरता सुसज्ज प्रशिक्षण  केंद्र उभारण्यात येत आहे. 

गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथे सदर प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. सेवा दलाचे संस्थापक ना.सु.हर्डिकर यांची समाधी देखील याच ठिकाणी आहे. यामुळे याच ठिकाणापासून सेवा दलाला नवसंजीवनी देण्याच्या कार्याला प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठीच या ठिकाणापाज्ञुन तयारी करण्यात येत आहे. या प्र्रशिक्षण केंद्राचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचं उदघाटन करन पक्ष बांधनीला बळकटी देण्यात येणार आहे. तर आगामी निवडणुकांसाठी विरोधी पक्षांसमोर आव्हान निर्माण करण्याचीच ही तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 

स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान स्थापन केलेल्या  काँग्रेस सेवा दलाचे संस्थापक ना. सु. हर्डिकर यांनी आपले शेवटचे दिवस घटप्रभा येथेच वास्थव्य केले होते. घटप्रभा येथील आरोग्य धाम आवारामध्येच त्यांची समाधी आहे. यासाठी या ठिकाणी 5 एकर जागा उपलब्ध आहे. याच ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. एकाच वेळी 200 जणांना प्र्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने हे केंद्र उभारण्यात येत आहे. 

दलाच्या माध्यमातुन काँग्रेस पक्षाला बळकटी  मिळवुन देण्यासाठी  प्रत्येक महिन्यातील चौथ्या रविवारी काँग्रेस कार्यालया समोर ध्वजारोहन करण्याची सुचना पक्षातील नेत्यांना केली आहे. तसेच सेवा दला प्रत्येक जिल्ह्यात अधिक बळकट करण्याची सुचना ही केली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांची काँग्रेस कडुन जोरदार तयारी सुरु झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांच्या नेमणूकीलाही गती देण्यात आली आहे.

काँग्रेस सेवा दल हे काँग्रेस पक्षाचा एक भाग आहे. देशामध्ये कोणत्याच ठिकाणी कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र नाही. बहुदांश ठिकाणी झोपड्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. उडपीमध्ये लहानसे केंद्र नुकताच उभारण्यात आले आहे. मात्र बेळगाव (घटप्रभा) येथे उभारण्यात येणारे केंद्र सर्वात मोठे ठरणार आहे. तसेच प्रमुग प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे. असे सेवा दलाचे माजी जिल्हा अध्यक्ष , बेळगाव लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी सांगीतले. 

15 वर्षा नंतर सेवा दलाकडे....

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात सेवा दल अधिक बळकट होते. त्यानंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सेवा दल दुर्बल बनले. एस.एम.कृष्णा मुख्यमंत्री असताना 2003 मध्े बेळगाव येथे राष्ट्रीयस्थरावरील प्रशिक्षण शिभीर झाले होते. विविध राज्यातील 1500 जणांनी प्रशिक्षण घेतले होते. या नंतर एकदाही प्र्रशिक्षण झाले नाही. आता 15 वर्षा नंतर सेवा दलासाठी प्र्रशिक्षण केद्र तयार होत आहे.